May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमारमुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतोहा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. I can follow Marathi. But this comment place has no Devanagari script facility!
    I’m fascinated by astringent taste of in writings here, which is unusual!!! While everyone goes for “namkin – tikha – khatta – meetha, this is something.

    ReplyDelete
  2. @Anonymous आंतरजालाशी संपर्क असणारे सर्वच अन्य-भाषिक – वाचक व ब्लॉगलेखक – इंग्रजी जाणतात. मी लेखनात शक्यतो विषयाला अनुसरून पारिभाषिक शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो. आणि हे विषय कांही वेळा आजच्या काळाला युक्त असले तरी अ-पारंपरिक असतात. हे खरं ! अन् माझे ब्लॉग पाहणारे वाचक अधिक असावेत असं मला वाटते. :-) आपले स्वागत आहे.
    अनामिका, मनःपूर्वक आभार! परतभेट जरूर द्यावी! :-)

    ReplyDelete