"The Great Wave" by Katsushika Hokusai (1760-1849) colour woodcut
सर्व अंगागांतील प्राण- - -
एकवटले पापणीआड
अन् पांच हजार वर्षांचा
पाखंडाचा बांध उलथला
प्रलयाचे थैमान घेऊन आला
दंभाचे महावृक्ष उलथून गेला
२३ - ५ - १९९७
टीप: चित्र-सदर्भ - "The Great Wave " "द ग्रेट वेव", चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) याचा रंगीत वुडकट.
पावसाचा हंगाम सुरू झाला की लोक जीव मुठीत घेऊन असतात, वेगवेगळ्या कारणासाठी -- पाऊस पडेल का, वेळेवर पडेल का, की अवर्षण की पूर येतील का, वर आलेली शेती बुडेल का?
पण कोणता प्रलय - सामाजिक की नैसर्गिक - किती हानिकारक आहे की लाभदाई ठरेल हे कोण व कशाच्या आधारावर ठरवणार?
माझा लाडका तुकाराम मात्र मला ऐकू येतो: "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती". कितीक युद्धे - महायुद्धे गेली पाचशे वर्षे चालूच आहेत. तरीही (गरिबांची) लोकसंख्या वाढतेच आहे; त्यांना जगायला पुरेसे जेवण मिळत नाही मग औषधपाणी कुठले? का हे कोणी महाभाग शास्त्रज्ञ का ते सांगू शकत नाही. याच्यात निसर्गाचा वाटा किती आणि तथाकथित आधुनिक मानवीय सुधारणेचा वाटा किती?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
No comments:
Post a Comment