October 14, 2008

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्रमा

नर्मदेची बाळें


माझी नर्मदेची परिक्रमा
माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच. नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला हा प्रवास. इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नर्मदासुद्धा सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे.


मी काही मूर्तिपूजक नाही. नाही मी संघटीत धर्मसंस्थामध्ये विश्वास ठेवीत. नाही मी ईश्वरवादी, नाही मी निरीश्वरवादी. कोणत्याही धर्माच्या, कुणाच्याही ईश्वराच्या वादात पडायचे नाही. श्रध्दा जर कृतीमध्ये परिवर्तीत होत नसेल आणि त्यात सर्व जीवमात्राची जाणीव नसेल तर तिला अंधश्रध्दा म्हणावी लागेल.

महाकालीचापण रूढ़ अर्थाने मी भक्त नाही. पण महाकालीच्या संकल्पनेचे वास्तव दर्शन मला नर्मदेमध्ये झाले. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्राच्या उत्सवाची सांगता मी सोबतच्या छायाचित्राने करतो.
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

  1. first of all, ur portraits are very differnt and thus interest-provoking !!

    माझीही इच्छा आहे नर्मदा परीक्रमा करायची... मूख्यतः जगन्नाथ कूंटेच पूस्तक वाचून...
    अजूनही अनूभव share करा...

    ReplyDelete
  2. Thank you Harshada for your visit and comment.
    All my blogs - prose and verses - are documentation of my 'parikrama' and the experiences on my way, which I leave for the posterity. But surely I would like to write on and about Narmada.
    I read G.N. Dandekar (Kuna Ekachi Bhramangatha) decades ago and was carried away.
    I also visited your blogs: both are unique. I shall sure write my responses.
    ---Remi

    ReplyDelete
  3. mazya don parikrama zalya.kharokhar narmadechi sarv bale vandaniy aahet.

    ReplyDelete
    Replies
    1. वंदना ! मीपण नर्मदेचे बाळ आहे. आणि मला याचा अभिमान वाटतो व आनंद होतो. जेव्हा मी नर्मदेला भेट दिली तेव्हा प्रत्येक भेटीत कितीक ओंजळी तिचे पाणी पीत असे. नर्मदेला तपोभूमी म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. याचाही अनुभव घेतला. नर्मदेवर अनेकदा लिहिलेय, जरूर वाचावे ! धन्यवाद !!

      Delete