December 16, 2009

वानसे जेथे वन्यजीवन तेथे वसे


एका कोळीयाने
गच्चीच्या कट्ट्यावर ठेवलेल्या कुंड्यांतली झाडे: कोरफड, ब्राम्ही, आवल्याचे रोप, तुळस, अबोली, गुलाब, इत्यादि. तेथे बांधिले एका कोळियाने जाळे. काही दिवसानी पाहिले तर ते नाहीसे झाले होते. कुणीतरी "साफसफाई" केली होती!

जेथे वानासांची जोपासना केली जाते तेथे सूर्यप्रकाश असतो -- असावा; पाण्याचा ओलावा असतो; विविध कीड़े, अळ्या, डांस, कीटक, माशा, मधमाशा, गांडुळे . आणि असंख्य जीवाणू (bacteria) असतात.

कोळ्याला उपजतच माहीत असते कुठे जाळे बांधावे. (घरातही कोळीष्टके असतात.) कधी कोळी भक्षक असतो, कधी तो भक्ष्य (विशेषत: रासायनिक कीट्कनाशकांचा बळी) होतो. निसर्ग - सृष्टी -- प्रकृति इच्या "पर्यावरण + पारिस्थितिकी + उर्जा" यांच्या संतुलनपूर्वक नियोजनाचा हा भाग असतो. पण माणसाराखा, विशेषत: इतिहासपश्च मानवासारखा (Post-historic man) अनिवार, अमर्याद भक्षक दुसऱ्या कोणत्याही योनीत (species) नसेल.

एकदा रस्त्याच्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मी भटकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एके ठिकाणी डामरी रस्त्याच्या कडेला "NSS" या संस्थेचे स्वयंसेवक कामास लागले होते. काम काय? रस्त्याच्या कडेला मातीत नव्याने रुजलेली रोपती उपटून ते "साफसफाई" करीत होते.
नागरी संस्कृतीची सौंदर्याची कल्पना फारच विचित्र आहे, भोगवादी दृष्टीसुखाच्या लालसेने लडबडलेली, मग ते कोळ्याचे जाळे असो कि वर्षभर मातीत सूप्त असलेल्या बीजांतून उगवालेली रोपे असोत. ती वानसे वन्यजीवन एकमेकांचे पोषण - निर्वाह करीत असतात. पण लक्षात कोण घेतो!

वनस्पतींची उपज आणि जोपासना नियमित केल्याने शारीरिक व मानसिक स्वस्थ्याला मदत तर होतेच, पण नकळत ध्यानाला पण चालना मिळते. कारण साधे आहे, वानसे चर्पटपंजरी करत नाहीत. तरीही इथे संतत काहीतरी असते. एक अनोखा वास्तव चलतचित्रपट दिवसरात्र चालू असतो. इथे स्थूल स्तरावर (micro level) महान विश्व जमात (cosmic community) कार्यरत असते. येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत संपर्कात येतात.

वरील छायाचित्र अगदीच सामान्य आहे. तसेच वरचे लेखनही, सामान्य व रोखठोक. त्यात कोणत्याही प्रकारचे नाटय - अलंकार - काव्य नाही. आहे ते जीवनाचे नाटय - काव्य जे स्वत:च शोधायचे अन् अनुभावायचे. जे काही आपल्याला कळले वाटते ते आपल्या बोधन क्षमतेप्रमाणे (perception); ते वळतेच असे नाही.
शब्द - चित्र - ध्वनी असतात फक्त वास्तावतेचा आभास, केवळ मायावी वास्तवता.


~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

3 comments:

  1. येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत संपर्कात येतात.
    .
    अश्या कैक गोष्टी आपल्या नकळत निसर्गात घडत असतात नाहि.. आपन मात्र या गोष्टी छान आनी सुक्ष्मपने पाहता, मस्त लिहता...

    आपला..

    साळसुद पाचोळा.

    ReplyDelete
  2. पाचोळा, वृत्तीने शेतकरी असल्यामुळे, ही वस्तू मला मूल्यवान आहे. अर्थातच माझ्या लेखनाला पाचोळा खतपाणी देतो.
    मी आपला नोंद घेतल्याबद्दल आभारी तर आहेच, पण आपला ब्लॉग - जालनिशी-- पाहिल्यावर पटले हा केवळ योगायोग नाही. तुमच्या ब्लॉग वर कबीराची उपस्थिति पाहून आनंद झाला.

    -- रेमी

    ReplyDelete
  3. रेमी...

    आपले सारे ब्लाग आम्ही वाचले/पाहिले. व्रुत्तीने आणि जन्मानेही आम्हीही शेतकरी आहोत, आपले ब्लाग हि शेतकरी स्वभावाचेच आहेत त्याचमुळे आपले चारही ब्लाग आम्हास जवळचे वाटताहेत. आपल्या एका ब्लाग मध्ये आपले कोकणातिल घरही पाहिले, छान आहे, घर पाहून आपन पक्के शेतकरीस्वभावाचे आनी ग्रामीन आस्था असनारे असाल ह्याची पुरेपुर खात्री पटलि. आपले छान जमेल.. मातीपासून लाकडी साच्याच्या मदतिने सफेद कच्च्या विटा बनवून आम्हीही गावाला घर बांधले होते, फार वर्षे झाली त्यास. आता तसी घरे बांधनारे कुणी दिसत नाहि... आपण आम्हास आमचा भुतकाळ याद दिलास. धन्यवाद.

    .

    साळसूद पाचोळा.

    ReplyDelete